खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील सांगवा फाट्यानजिक अज्ञात वाहनाच्या धडकेत नालवाडा येथिल २४ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक २२ ऑगस्ट रोजी सायं ७:३० वाजताच्या सुमारास घडली.चंदन अरुण गावंडे (२४) रा.नालवाडा असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव असून आज सायंकाळी पोळा सुटल्यानंतर चंदन घरी आला घरी बैलजोडी बांधून तो असदपूर येथे भजनासाठी जात असतांना त्याच्या दुचाकी क्रं MH 27 DB 3137 हिला सांगवा फाट्याजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.