रावेर तालुक्यात कुसुंबा हे गाव आहे. या गावातील रहिवाशी रवींद्र भीमसिंह पाटील वय ५० या इसमाने काहीतरी विषारी किटकनाशक औषध सेवन केले होते. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांना मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील लाईफ केअर हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.