ग्रामीण भागातील प्रवाशांचे हित पाहिले जात असून आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगाव आगाराला दहा नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नजीकच्या काळात जास्तीत जास्त बसेस देऊन ग्रामीण भागातील जनजीवन सुरळीत केले जाणार आहे, अशी माहिती काडसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉ. अरुणाताई बर्गे यांनी दिली.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगाराला शनिवारी नव्याने पाच बसेस देण्यात आल्या असून सकाळी साडेअकरा वाजता डॉ. बर्गे यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले.