दिग्रस शहरासह तालुक्यातील गणेशभक्तांनी आज बुधवार दि. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. यंदा दिग्रस शहरासह तालुक्यात एकूण १३७ मंडळात गणेशोत्सव साजरा होत असून, यामधील २२ गावांनी "एक गाव – एक गणपती" अभियान राबवून पर्यावरणपूरक संदेश दिला आहे. यात दिग्रस शहरात ५२ तर ग्रामीण भागात ८५ गणेश मंडळाचा समावेश आहे. शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून, सर्व मंडळांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेश मूर्ती खरेदीसाठी बाजारात भक्तांची प्रचंड गर्दी झाली.