जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश लागू केलेला असतांनाही प्रा. लक्ष्मण हाके यांच्या स्वागतासाठी बेकायदेशिर व कोणत्याही प्रकारची प्रशासनाची रितसर परवानगी न घेता गर्दी केल्याप्रकरणी पोलीस प्रशासनानेच दिलेल्या फिर्यादीवरून १७ जणांविरूध्द गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गेवराईतील छत्रपती संभाजी महाराज चौकात प्रा. हाके यांचे केलेले स्वागत संबंधित समर्थकांच्या चांगलेच अंगलट आल्याचे यावरून दिसुन येते. याचा पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत.