शेगाव व खामगाव तालुक्यातून तडीपार करण्यात आलेला एक इसम कालावधी संपलेला नसतांना शेगाव शहरात फिरत असताना आढळून आल्याने पोलिसांनी त्याला २९ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजे दरम्यान सम्राट अशोक चौक येथून ताब्यात घेऊन त्याचेवर कायदेशीर कारवाई केली.शेगाव शहरातील सुदामा नगर येथील रहिवासी शिवा अशोक शिंदे वय २९ यास खामगाव उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशावरून दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी सहा महिन्याकरिता तडीपार करण्यात आले होते.