शहरातील यशवंतराव शिंदे बॅटमिंटन हाल येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय बॅटमिंटन स्पर्धेत यश संपादीत करुन येथील लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे १९ वर्षांखालील गटातील विद्यार्थी जिल्हास्तरीय बॅटमिंटन स्पर्धेत पोहचले आहे.चंद्रपूर येथे भविष्यात होऊ घातलेल्या जिल्हास्तरीय बॅटमिंटन स्पर्धेत सदर विद्यार्थी भद्रावती तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.लोकमान्य विद्यालयातर्फे या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले असुन त्यांना पुढील यशासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.