इरई धरणाची पातळी २०७.३२५ मीटर वाढ झाली आहे. त्यामुळे आज दि ११ सप्टेंबर ला ७:३० ला तीन दरवाजे ०.२५ मीटर ने उघडले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव,चंद्रपूर, माना आणि इतर इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आज जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.