व्यापारासाठी दिल्लीत तुमच्या मित्रांकडून मला 50 लाख रुपये पाठवा. मी तुम्हाला कोल्हापुरातून पैसे पोहोचवतो, असे म्हणत तीन अनोळखी व्यक्तींनी सांगलीतील बेदाणे व्यापारी राजेश लक्ष्मीनारायण मुंदड यांना ४९ लाख ९० हजारांचा गंडा घातलाय. खऱ्या नोटांखाली त्याच आकाराचे कोरे कागद ठेवून त्यांनी फसवणूक केलीय. याप्रकरणी फिर्यादीने दिलेला तक्रारीनुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.