25 ऑगस्ट रोजी कळंबा इथल्या मनोरमा कॉलनी येथे झालेल्या गॅसच्या स्फोटामध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून यापैकी मोहम्मद उजेरअलबी याला अटक करण्यात आली असून आज जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केला असता त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली आहे.