लातूर- केवळ बुद्धिबळाच्या वेबसाइटवर सराव करीत लातूर जिल्ह्यातील रेणापूरच्या समृद्धी देवीदास कातळे हिने नुकत्याच छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या ज्युनिअर गटातील राज्य स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मानांकन मिळविले असून फिडेच्या रेटिंगमध्ये स्थान मिळविणारी पहिली लातूरची महिला खेळाडू ठरली आहे तिच्या या यशाबद्दल लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांनी यथोचित सत्कार करून कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.