नेज येथील ग्रामपंचायतीने पाणीपट्टी व घरपट्टीची थकबाकी वसुलीसाठी थकबाकीदारांवर कठोर कारवाई सुरू केली आहे.थकीत रक्कम न भरल्यामुळे मंगळवार (दि. ९ सप्टेंबर)पासून थकबाकीदारांची नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.ग्रामपंचायतीकडून वेळोवेळी थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासोबतच कर्मचार्यांकडून बीलेही वितरित करण्यात आली होती.मात्र,याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामपंचायतीने थेट कृतीचा मार्ग स्वीकारला आहे.