रावेर तालुक्यात खिरोदा हे गाव आहे. या गावाकडून फैजपूर जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर एक नाला आहे. या नाल्याला पूर होता आणि त्या पुरातून जात असताना शांताराम खरते वय ३८ हा तरुण वाहून गेला आणि काही अंतरावर पाण्यात बुडून त्याचा मृतदेह मिळून आला. सावदा पोलिसांना माहिती देण्यात आली त्याचा मृतदेह रावेर रुग्णालयात नेण्यात आला तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तेव्हा सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.