मुरबाड तालुक्यातील जवळपास 112 पर्यटक नेपाळमध्ये दर्शनासाठी गेले होते मात्र सध्या तिथे जाळपोळ आणि दंगल सुरू असल्यामुळे ते पर्यटक तेथेच अडकले आहेत. त्या पर्यटकांनी मदतीसाठी आमदार किसन कथोरे यांच्याशी संपर्क साधला. आमदार किसन कथोरे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी पांचाळ आणि मुख्यमंत्री यांची संवाद साधून तुम्हाला सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पर्यटकांना दिले तसेच बाहेर न पडण्याचे आवाहन केले.