हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप झालेल्या ऊसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ५०० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना द्यावा,तोडणी व वाहतूक प्रक्रियेत होणाऱ्या गैरप्रकार यासह अन्य मागणी बाबतचे निवेदन जय शिवराय संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने शिरोळ दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथ पाटील व संचालक गणपतराव पाटील यांना आज सोमवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता देण्यात आले.सदर निवेदनात म्हटले आहे की गेल्या वर्षभर साखरेला सरासरी दर रु. ३८०० ते ३९००/- आहेत.