धाबेपिंप्री या गावाजवळ मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सीमा तपासणी नाके आहे. येथे वाहन क्रमांक एम. पी.१२ झेड. इ.६४८७ यामध्ये मोहम्मद रफीक, रेहान खान,शकील कुरेशी व फिरोज कुरेशी हे चार धन अवैधरित्या १८ म्हशींची वाहतूक करत होते. याची माहिती पोलिसांना मिळतात पथक त्या ठिकाणी गेले त्यांनी म्हशी वाहन असा एकूण ९ लाख ४३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला व या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.