चालत्या मोटरसायकल वरून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेल्याचा प्रकार घडला असून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार पुष्पा प्रशांत देवरे राहणार धात्रक फाटा या त्यांच्या ऍक्टिवा मोपेड दुचाकी वरून मुंबई आग्रा हायवे ओझर बाजूकडून जात असताना युनिक फर्निचर मॉलच्या समोर सर्विस रोडवर मागून आलेल्या एका इलेक्ट्रिक मोपेड दुचाकी वरील इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले.