आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड पोलीस ठाण्यात नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत शांतता समिती बैठकीचेआयोजन करण्यात आले.या बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलिस उपआयुक्त किशोर काळे,सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी तसेच शेखर देशमुख,नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख आदि उपस्थित होते.