खामगाव शहरातील सतीफैल भागातील नगरपरिषद शाळा क्रमांक दोन जवळ गणपती मंडपाच्या कामामुळे मेन २५० एमएमची पाईपलाईन फुटल्यामुळे दुरुस्तीचे काम झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी तसेच गेरू माटरगाव येथील विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे दोन्ही टाकीवरील पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. त्यामुळे कोणतेही वेळापत्रक देता येणार नाही, अशी माहिती नगर परिषद पाणी पुरवठा विभागाच्या वतीने आज दिनांक ३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजे दरम्यान देण्यात आली आहे.