चोपडा तालुक्यात लासुर हे गाव आहे. या गावातील रहिवाशी गणेश आशालाल चौधरी वय ४१ हा इसम घराबाहेर जात असताना चक्कर येऊन जमिनीवर कोसळून बेशुद्ध झाला. त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे आणण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.