साखर कारखान्यांनी गत वर्षी साखर, बगास व मळीपासून मोठा नफा कमावलेला असून, या नफ्यातून शेतकऱ्यांना सप्टेंबर अखेरपर्यंत दुसऱ्या हप्त्याचे वितरण करावे, अशी मागणी अंकुश या शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे.या मागणीसाठी सोमवार, १५ सप्टेंबर रोजी मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून,या रॅलीत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी आज,शनिवारी दिनांक १३ सप्टेंबर रोजी दुपारी साडे बारा वाजता केले आहे.