गणेश विसर्जन मिरवणुकीकरीता आज दिनांक २९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजे दरम्यान शहर पोलिस स्टेशनमध्ये गणेश मंडळांची क्रमवारी जाहीर करण्यात आली. लकी ड्रॉ पध्दतीने चिठ्ठया काढून गणेश मंडळांचे नंबर जाहीर करण्यात आले. खामगाव शहरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा येत असून गणेश विसर्जन ६ सप्टेंबर रोजी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखिल शहरातून भव्य गणपती विसर्जन मिरवणूक निघणार आहे.