परळी तालुक्यातील सिरसाळा परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मोबाईल फोनसह रोकड रकमेस चोरट्यांनी हात साफ केला. यामुळे प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परळीहून सिरसाळ्याकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवाशांची गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी प्रवाशांच्या खिशातील मोबाईल, रोकड रक्कम व इतर मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला. प्रवाशांनी आपल्या वस्तू चोरीस गेल्याचे लक्षात येताच बसमध्ये एकच गोंधळ उडाला.