अनेक वर्षांपासून रखडलेला, चर्चेत राहिलेला आणि वारंवार वाद निर्माण करणारा हदवाडीचा ठराव अखेर आज जुना धामणगाव सभागृहात मंजूर झाला गेल्या अनेक वर्षांपासून विकास व्हावा या उद्देशाने जुना धामणगांव हद्दीत असणाऱ्या 63 कॉलनी नगर परिषद हद्दीमध्ये देण्याकरिता नागरिकांचे ग्रामपंचायत जुना धामणगावला वारंवार निवेदने व आंदोलने करण्यात आली. अखेर जुना धामणगाव येथे झालेल्या ग्रामसभेमध्ये सर्वानुमते 63 कॉलनी या नगरपरिषद हद्दीमध्ये देण्याचा ठराव पास झाला आहे .यावेळी 63 कॉलनीतील पुरुष, महिला, हजर होते.