प्राणघातक गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अंबड लिंक रोड येथे ताब्यात घेतले आहे.पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी व तेजस मते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शुभम कुमार भूषण सिंग हा विनापरवानगी प्राणघातक गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगून अंबड लिंक रोडवरील विराट नगर, संत शिरोमणी सावता महाराज क्रीडांगण कंपाऊंडच्या भिंतीलगत फिरताना आढळून आला आहे. त्यानुसार सदर ठिकाणी सापळा रचून शुभम कुमार भूषण सिंग याला ताब्यात घेतले.