मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठीचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून २९ ऑगस्टपासून सुरू होणारे आंदोलन हे 'शेवटचे युद्ध' ठरेल,असा थेट इशारा चंदगड तालुका सकल मराठा समाजाने सरकारला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता कोवाड येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.