यवतमाळ येथील आझाद मैदानावरील येरावारा चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी काळी शाई टाकून विटंबना केली आहे. त्यामुळे सर्व फुले-प्रेमीच्या भावना दुखावल्या आहेत. सदर प्रकरणी तात्काळ आरोपींचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी, जिंतूर तालुक्यातील चारठाणा परिसरातील फुले प्रेमींच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबत आज बुधवार दिनांक 24 एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता चारठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कापुरे यांना लेखी निवेदन देण्यात आले.