जोडभावी पेठ आणि जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंकज राजु जेनुरे या 27 वर्षीय तरुणास पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एम पी डी ए कायद्यान्वये स्थानबद्धतेचे आदेश जारी केले त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आलीय.अशी माहिती जनसंपर्क कक्षातून आज सकाळी देण्यात आली पोलीस आयुक्तालयाच्या दप्तरी त्याच्याविरुध्द गंभीर स्वरुपाचे 08 गुन्हे दाखल आहेत.