सातारा शहराच्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पाहणी केली. या पाहणीचा उद्देश वाहतुकीचे नियोजन, गर्दीचे व्यवस्थापन आणि सुरक्षेची खात्री करणे हा आहे. वाहतूक व्यवस्थित करावे लागणारे आवश्यक बदल, नेमला जाणारा पोलीस बंदोबस्त आणि नागरिकांच्या सोयीसाठी उपाययोजनांचा समावेश असल्याचे दोशी यांनी पत्रकारांना सांगितले.