एरंडोल शहरात म्हसावत जाणारा रोड आहे. या रोडावर नागदूली फाटा आहे.या फाट्याच्या समोर असलेल्या हॉटेल जय महाराष्ट्राच्या समोर एका विनाक्रमांच्या डंपर मधून पंकज ठाकूर व अकील पटेल हे वाळू चोरी करून नेत होते. पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले त्यांनी डंपर वाळू असा ८ लाख १२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात दोन जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.