नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातल्या हूनगुंदा या पूरग्रस्त गावातील गावकऱ्यांनी पालकमंत्री अतुल सावे यांच्या समोरच गोंधळ घातला. आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या दरम्यान पालकमंत्री अतुल सावे नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते. बिलोली तालुक्यातील हूनगुंदा येथे जाऊन त्यांनी मेडिकल कॅम्पला भेट दिली. पुढे दोन तालुक्यातला दौरा बाकी राहिल्याने ते निघाले होते. मात्र शेती नुकसानीची पाहणी करण्याचा हट्ट करत गावकऱ्यांनी गोंधळ घालत एकच हट्ट केला. गावकरी आक्रमक झाले