चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेने गणेश विसर्जनाच्या दिवशी पडोली चौक येथे काल दि ६ सप्टेंबर ला रात्री ७ वाजता सापळा रचून मोठी कारवाई करीत तब्बल २९८ ग्राम ब्राऊनशुगर/हेरॉईन जप्त करीत २ आरोपीसह तब्बल ३० लाख १९ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष बाब म्हणजे अनंतचतुर्दशी ला पोलीस यंत्रणा हि विसर्जनाच्या कामात व्यस्त असते आणि त्यादिवशी नशेचा व्यापार करणाऱ्या आरोपींनी ब्राऊनशुगर आणण्याचा डाव साधला मात्र स्थानिक गुन्हे शाखेने त्यांचा डाव हाणून पाडला.