कोडोली गावात बुधवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली.अवघ्या दहा वर्षांचा श्रावण अजित गावडे या चिमुकल्याचा अचानक हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. श्रावणने आपला अखेरचा श्वास आपल्या आईच्या मांडीवर घेतल्याने संपूर्ण गाव भावविवश झाला आहे.श्रावण आनंदनगर वसाहतीतील शिवनेरी गल्लीमध्ये राहत होता. बुधवारी संध्याकाळी तो गणेश मंडळाच्या शेडमध्ये मित्रांसोबत खेळत असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटले.खेळ सोडून तो धावत घरी आला व आईच्या मांडीवर डोके ठेवून विसावला.