सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार असल्याने कोयना धोम बलकवडी यासह अन्य धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोयना धरणाचे सर्व सहा वक्र दरवाजे सोमवारी दुपारी दोन वाजता एक फुटाणे उघडण्यात आले असून त्याद्वारे कोयना नदी पात्रात ८ हजार ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पायथा विद्युत गृहाची दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. एकूणच कोयना नदीमध्ये दहा हजार ९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.