लातूर -लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १००% शास्ती माफी योजना जाहीर करण्यात आली आहे. ही योजना २४ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत लागू राहणार असून या कालावधीत थकीत मालमत्ता कराचा एकरकमी भरणा केल्यास आकारलेले व्याज वा दंड पूर्णपणे माफ करण्यात येणार आहेत.