नेज-शिवपुरी ग्रामपंचायतीकडून थकित घरफाळा व पाणीपट्टी वसुलीसाठी आता ठोस पावले उचलण्यात येत आहेत.अनेक वेळा सूचना देऊनही थकितदारांनी कर भरलेला नसल्यामुळे ग्रामपंचायतीकडून कठोर निर्णय घेण्यात आला आहे.उद्यापासून ता.१२ सप्टें. पासून ३,००० रुपयांपेक्षा अधिक थकीत असलेल्या नागरिकांचे पाणी कनेक्शन थेट तळातून JCB च्या सहाय्याने बंद करण्यात येणार असल्याचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांनी आज गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता जाहीर केले आहे.