सालबर्डी गावाचा फाटा आहे. या फाट्याजवळ अपघातात महेंद्र उर्फ दीपक दौलत कोळी वय ४५ हा इसम गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचार करिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तेव्हा याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.