लातूर -लातूर शहरात आज बुधवारी गणरायाच्या आगमनानिमित्ताने ढोल-ताशांच्या गजरात तरुणाई थिरकताना दिसली. "गणपती बाप्पा मोरया" च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले. उत्साह, आनंद आणि भक्तिभावाने शहराचे वातावरण भारावून गेले होते.मात्र आज रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान अचानक कोसळलेल्या जोरदार पावसामुळे गणेशभक्तांची मोठी तारांबळ उडाली.