मुळेगाव तांडा येथील बनावट देशी-विदेशी मद्य तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकली.त्याठिकाणी देशी-विदेशी दारूच्या तब्बल १००२८ बाटल्या सापडल्या.याशिवाय विविध कंपन्यांचे लेबल, बुचणे देखील आढळली. या पथकाने कारवाईत एकूण १२ लाख ७० हजार ३२० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.अशी माहिती आज सायं राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली.