अंबवडे, ता. खटाव येथे एका महिलेच्या विनयभंग व मारहाण प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीच्या विरोधात वडूज पोलिसांनी अवघ्या ४८ तासात दोषारोपपत्र दाखल परत आपली कार्यतत्परता दाखवून दिली आहे. याबाबत वडूज पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी सहा वाजता दिलेली माहिती अशी, २४ ऑगस्ट रोजी सकाळी एका महिलेचा विनयभंग करण्यात आला होता. या प्रकारानंतर त्याचा जाब विचारण्यासाठी सदर महिला व तिचे पती आरोपीच्या घरी गेले होते. त्यादरम्यान आरोपी, त्याचा भाऊ व पुतण्या यांनी शिवीगाळ व दमदाटी केली होती.