लातूर -लातूर शहरातील जुना वार्ड क्रमांक २६ व सद्याचा प्रभाग ६ या भागात शासकीय महाविद्यालयासमोर असलेल्या झोपडपट्टी धारकांना आर्वी येथील गायरानात पुनर्वसित करण्यात आले आहे. सद्या हे नागरिक अनेक नागरी सुविधांपासून वंचित असून त्यांच्या घरांचीही मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. त्याचबरोबर अनेक कुटुंबाना अद्यापपर्यंत मनपाकडून कबाले देण्यात आले नाहीत. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे सदर नागरिक राहत असलेल्या परिसराची मोठी दुरावस्था झाली आहे.