राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भंडार पाटील यांचा मुलगा विजय पाटील यांची अठरा वर्षांपूर्वी 10 एप्रिल 2007 रोजी हत्या झाली होती. याप्रकरणी तेरा आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते या प्रकरणाचा खटला तब्बल 18 वर्षे चालला आणि अठरा वर्षानंतर चार ऑगस्ट 2025 रोजी दहा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आणि तीन आरोपींना दोषी ठरवण्यात आले. या तीन आरोपींना आज कल्याण कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विजय बाकडे, साजिद शेख, सुनील भोईर असे आरोपींची नावे आहेत