चोपडा शहरात शिक्षणासाठी आलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुली वरती अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील अविनाश पावरा या तरुणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत बलात्कार केला. सदर प्रकार हा जानेवारी २०२३ पासून ते २६ जून २०२५ दरम्यान घडला. घडलेला प्रकार या अल्पवयीन मुलींनी आपल्या कुटुंबाला सांगितल्यानंतर याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.