2025-26 चालु आर्थिक वर्षातील मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा करणाऱ्यांना सवलत दिली जात असुन 30 सप्टेंबर पूर्वी कराचा भरणा केल्यास 8 टक्के सूट देण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने कर भरल्यास अतिरिक्त 2 टक्के म्हणजेच 10 टक्के सूट मनपामार्फत देण्यात येत आहे. मालमत्ता करावरील ही सूट 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच देण्यात येत असल्याने अधिकाधिक नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा करून या अतिरिक्त सूटचा लाभ घेण्याचे आवाहन आज दि 8 सप्टेंबर ला सायंकाळी 5 वाजता चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.