वर्धा जिल्ह्यातील मांडवा, पुलई, बेलगाव परिसरातील लँको विदर्भ थर्मल पॉवर लिमिटेड या प्रकल्पाची जमीन अखेर शासन ताब्यात घेणार असून, त्या ठिकाणी प्रदूषण विरहित प्रकल्प व लघु औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या मागणीसाठी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी या ऐतिहासिक निर्णयाबद्दल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे