आज रविवार,दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता हिप्परगी धरणात महाराष्ट्रातून आलेल्या कृष्णा नदीच्या पाण्यामुळे धरणाची पातळी 524 मीटरवर पोहोचली असून, अलमट्टी धरणाची पातळी 518.5 मीटर आहे. सध्या नदी काठोकाठ भरलेली असून,पाण्याची वाढ झाली तर ते शेतांमध्ये पसरू शकते,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.पुलाच्या डाव्या बाजूस सुमारे चार ते पाच किलोमीटर लांबीचा भराव टाकण्यात आलेला असून, त्यामुळे पाण्याला पुढे सरकण्यास अडथळा निर्माण झाला आहे.