दिग्रस शहरातील श्रीकृष्ण टॉकीज परिसरात अज्ञात चोरट्यांनी विहिरीतून पाण्याची मोटर व इतर साहित्य चोरी केले. या प्रकरणी दिग्रस पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गोपाल मोहन खेडकर (वय ३१, रा. श्रीकृष्ण टॉकीजजवळ, दिग्रस) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या विहिरीत बसविलेली पाण्याची मोटर दिनांक २२ ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या मोटारीची किंमत सुमारे ३ हजार ५०० रुपये इतकी आहे.