सण-उत्सव म्हणजे केवळ आनंदोत्सव नसून तो समाजजागृतीचा आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून देणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे. पिंपळनेर शहरातील महाराणा प्रताप चौक भोईराज मित्र मंडळ याचे उत्तम उदाहरण आहे.या मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात “एक मूर्ती – एक गाव – एक गणपती” हा अभिनव आणि प्रेरणादायी संकल्प मांडला. केवळ संकल्पनेत न थांबता त्यांनी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत, पिंपळनेर परिसरातील ग्रामीण भागात असणाऱ्या महूगाव या गावाला गणेशमूर्ती भेट दिली.