बोरावल खुर्द या गावात घराचे बांधकाम एक जण करत होता. तेव्हा आमच्या जागेत तुम्ही भिंत का बांधत आहे अशा बोलण्याच्या रागातून चेतन महाजन, कैलास महाजन, अशोक महाजन व रमेश महाजन या चार जणांना मनोज मोरे, मुकेश मोरे, नितीन मोरे व रवींद्र मोरे यांनी मारहाण केली. तेव्हा या चार जणाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.