इचलकरंजी शहरातील संतोष जावीर यांनी काही दिवसांपूर्वी श्रीराम फायनान्सकडून जुपिटर दुचाकी घेतली होती.मात्र,दोन हप्ते थकित राहिल्याने फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गाडी जप्त करून लक्ष्मी मंदिरजवळील आवाडे सब स्टेशन शेजारी असणाऱ्या अपार्टमेंटच्या गोडाऊनमध्ये ठेवली होती.गाडी परत घेण्यासाठी संतोष जावीर आपल्या सहकाऱ्यांसह तेथे गेले असता विवेकानंद आरेकर यांनी त्यास विरोध केला.या घटनेने दोन्ही गटांत वाद निर्माण होऊन मारामारी व पेट्रोल टाकण्याचा प्रकार घडला.